Sourav Ganguly Hospitalised: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी

हृदयात होते दोन ब्लॉग्केज

एमपीसी न्यूज – बीसीसीआय अध्यक्ष व भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली याला हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गांगुली यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांच्या हृदयात दोन ब्लॉग्केज होते असं त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टर अफ्ताब खान यांनी सांगितले.

व्यायामशाळेत व्यायाम करताना सौरव गांगुली यांची अचानक तब्येत बिघडली, हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना कोलकाताच्या वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत त्यांच्या हृदयात दोन ब्लॉग्केज असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली.

सध्या गांगुली यांची प्रकृती स्थिर असून पुढील चोवीस तास ते वैद्यकीय निरीक्षणाखाली असणार आहेत.

दरम्यान, सौरव गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह सर्वच क्षेत्रातून प्रार्थना केली जात आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी गांगुली यांच्या तब्येतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.