South African Oasis : अद्भुत, अविश्वसनीय – हाकुना मिपाका

Wonderful, incredible - Hakuna Mipaka स्वाहिली भाषेत  'हाकुना मिपाका' याचा अर्थ  'मर्यादा नाही' म्हणजेच 'अमर्याद' असा आहे.

एमपीसी न्यूज – ‘हाकुना मिपाका’ म्हणजे काय बरं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण हा नुसता शब्द नसून ती एक जीवनशैली आहे असे याची माहिती घेतल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल. स्वाहिली भाषेत  ‘हाकुना मिपाका’ याचा अर्थ  ‘मर्यादा नाही’ म्हणजेच ‘अमर्याद’ असा आहे. आता एकदम स्वाहिली म्हणजे आफ्रिकेतली भाषा वगैरे ही काय भानगड आहे ? असंच वाटलं ना, तर आता याची आपण सखोल माहिती घेऊया.

डीन श्नायडर हा व्यवसायाने बॅंकर असलेला स्विझर्लंडमधील एक तरुण. अतिशय हुषार, आपल्या व्यवसायात चोख पण अचानक एके दिवशी तो हे सगळं सोडून दक्षिण आफ्रिकेत जातो. तेथे ४०० हेक्टर वाळवंटाचे ओअॅसिस बनवतो. तिथल्या वन्य जीवांना आपलंस करतो, लळा लावतो. त्यांचा नैसर्गिक अधिवास जपून, त्यांच्या सवयी कायम ठेवून तो त्यांना निर्दय मानवापासून सुरक्षित बनवतो.

सध्या ‘हाकुना मिपाका’ हे ओएसिस हजारो वेगवेगळ्या वन्य प्राण्यांचे घर आहे. तेथे तो वेगवेगळ्या प्राण्यांचे पुनर्वसन देखील करतो, जे नंतर जंगलात सोडले जातात. सिंह, जिराफ, झेब्रा, तरस, माकडांपासून ते बिबट्या, वेगवेगळे सरपटणारे प्राणी आणि पक्षी हे सर्व या ओअॅसिसच्या अविश्वसनीय अशा वैविध्यपूर्ण परिसंस्थेचा भाग आहेत.

याविषयी बोलताना डीन म्हणतो, ‘हाकुना मिपाका ओएसिस हे माझे वैयक्तिक घर आहे आणि ते खाजगी अभयारण्य आहे,  जे लोकांसाठी खुले नाही. आम्ही येथे पर्यटकांना येऊ देत नाही आणि कोणत्याही प्राणी भेटींना परवानगी देत नाही.  तसेच येथे आम्ही जनावरांची पैदास करीत नाही आणि आम्ही जनावरांचा व्यापारही करीत नाही. मी ही जागा मनुष्यांसाठी नाही तर प्राण्यांसाठी बनविली आहे. हाकुना मिपाका ओएसिस हे येथे राहणा-या प्राण्यांचे सुरक्षित, वन्य आणि आजीवन घर आहे’.

डीन पुढे म्हणतो, ‘या सर्व गोष्टींचा मी संस्थापक आणि मालक असू शकतो, परंतु हाकुना मिपाका हा वन मॅन शो नाही.  हाकुना मिपाका एक जीवनशैली, एक मिशन आणि एक कुटुंब आहे. हे सर्व शक्य करुन देणारे हे अजब  लोक माझ्याभोवती असण्याचा मला खूप आनंद होतो. माझ्या कुटुंबापासून नोएह पर्यंत, माझे मुख्य सामग्री निर्माता, अ‍ॅडम (वैयक्तिक व्यवस्थापक), प्रिस्किल्ला (वैयक्तिक सहाय्यक), जेसी (फार्म मॅनेजर), शेर्णे (जेफची शेफ आणि बायको), सर्व सुरक्षा रक्षक, साफसफाई करणारे कर्मचारी आणि शेत कामगार. प्रत्येकजण एक अत्यावश्यक भूमिका निभावतो आणि आपल्या या कामात महत्वाचे योगदान देतो’.

 

_MPC_DIR_MPU_II

Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.