Southern Command : रक्षा लेखा प्रधान कार्यालयात वीरांगना दालनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज –  रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) सतीश पेंढारकर, भा.र.ले.से. यांनी रक्षा लेखा महानियंत्रक रजनीश कुमार, भा.र.ले.से. यांचे आज दुपारी कार्यालयाच्या प्रांगणात KSHIPRA 2.0 व “वीरांगना दालन” उद्घाटन समारंभात स्वागत केले. रक्षा लेखा विभागाद्वारे देशातील संरक्षण दलांना व संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या संस्थाना लेखापरीक्षण, लेखांकन, वेतन व आर्थिक सल्ला सेवा प्रदान केली जाते. रक्षा लेखा महानियंत्रक हे रक्षा लेखा विभागाचे प्रमुख होत. 

 

क्षिप्रा 2.0 (KSHIPRA 2.0) रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान), पुणे कार्यालयाने बनवलेली शैक्षणिक व्हीडीओंची एक मालिका आहे,  ज्या माध्यमातून सेनेच्या जवानांना त्यांच्या भर्तीपासून निवृत्तीपर्यंत, त्यांना देय असलेल्या पगार व भत्त्यांसंबंधी विस्तृत माहिती दिली आहे. जवानांच्या वेतन खात्यांचे संवर्धन करण्याची पद्धत अत्यंत क्लिष्ट असून या प्रक्रियेत जवान / जेसीओच्या तैनातीचे यूनिट, जवानांच्या रेजीमेंटचे रेकॉर्ड कार्यालय तसेच रक्षा लेखा विभागाचे वेतन लेखा कार्यालयही आपापली भूमिका बजावतात. रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (दक्षिण कमान) आपल्या आठ वेतन लेखा कार्यालयांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख सेना जवानांना वेतन वितरित करते.

 

सतीश पेंढारकर, भा.र.ले.से. यांनी क्षिप्रा वीडियो-मालिकेच्या निर्मितीमागील संकल्पनेचा आरंभ व जवानांना याबद्दल शिक्षित करण्याच्या नितांत गरजेबद्दल सांगितले.

 

‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उपक्रमांचा एक भाग म्हणून रक्षा लेखा प्रधान नियंत्रकांच्या  पुणे कार्यालयाद्वारे, देशासाठी प्राणपणाने  लढलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल,राणी अब्बक्का, झानों मुरमो यांसारख्या 25 महिला स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानित करण्यात आले. या वीरांगनांना समर्पित ‘वीरांगना दालना’ चे उद्घाटन रजनीश कुमार,भा.र.ले.से., र.ले.म.नि. यांच्या पत्नी,श्रीमती रत्ना कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

 

रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहाचे नामकरणही येथे पार पडले. हे सभागृह भारतीय सशस्त्र बंडाचे जनक ‘वासुदेव बऴवंत फडके’ यांना समर्पित करण्यात आले. त्यांनी पुणे येथील पूर्वीच्या मिलिटरी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम केले होते. रक्षा लेखा प्रधान नियंत्रकांच्या पुणे कार्यालयाच्या 1864 साली बांधण्यात आलेली इमारत वास्तुरचनात्मकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे.

 

 रजनीश कुमार, भा.र.ले.से. रक्षा लेखा महानियंत्रक महोदयांनी सर्व उपस्थितांना संबोधित करताना कार्यालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात अधिकारीवर्गाला वेग व ऑटोमेशनच्या नवीन वातावरणासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी प्रेरित केले. विभागाला सोपविण्यात आलेले कर्तव्य बजावताना वेतनवृद्धिच्या दृष्टिकोणापेक्षा नवरचनात्मक दृष्टिकोण अवलंबण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

या कार्यक्रमाला वरिष्ठ भा.र.ले.से. अधिकारी,मेजर जनरल पी.के. चहल, स्थानापन्न कमांडेंट, एमआईएनटीएसडी, ब्रिग. डी.जी. पटवर्धन,कमांडेंट, बीईजी & सेंटर, ब्रिग. ए.के. डे,कमांडेंट, एआईपीटी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.