SP Balsubramaniam: प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम लाईफ सपोर्टवर ; ‘आयसीयू’ मध्ये हालवले

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध दाक्षिणात्य पार्श्वगायक गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूत हालवण्यात आलं आहे. तसेच, व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती.
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. चेन्नईतील एमजीएम रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीन मध्ये असे म्हटले आहे की, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्यामुळे एमजीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एस पी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती आणखी खालावली असून त्यांना लाईफ सपोर्ट वर ठेवण्यात आले आहे.
13 ऑगस्ट पासून त्यांची प्रकृती गंभीर होत गेली व सध्या त्यांना आयुष्य मध्ये हलवण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ञांची एक स्वतंत्र टीम त्यांच्या सेवेत दाखल असून त्यांची काळजी घेतली जात आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना 5 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली आहे. बालसुब्रमण्यम यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. करोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याचं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं. त्यासोबत त्यांच्या आरोग्याविषयी चिंता न करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं होतं.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.