-MPC-TOP-MOST-BANNER-I

Akurdi News : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये चमचमीत आखाड स्पेशल फेस्टिव्हल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पावसाळा सुरु झाला की जशी मनसोक्त भटकंतीची, गरम गरम चहा, कांदाभजीची आठवण येते तशीच आणखी एका गोष्टीची देखील खरा खवय्या आतुरतेने वाट पाहात असतो. श्रावण महिना लागण्याआधी चमचमीत फिश, चिकन, मटण यावर कधी एकदा ताव मारता येईल याचे बेत ठरत असतात. कारण एकदा श्रावण सुरु झाला की नंतर मग गणपती, गौरी होईपर्यंत सामिष भोजनाचा विचारदेखील करता येत नाही. अशावेळी धुवांधार कोसळणा-या पावसात चमचमीत, मसालेदार नॉनव्हेज मस्टच असते.

खवय्यांना त्यांची नॉनव्हेज खाण्याची इच्छा तृप्त करण्यासाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागा येथे खास आखाड स्पेशल मेन्यू तयार करण्यात आला आहे. स्टार्टर्समध्ये चिकन बोटी कबाब, मसाला तंदुरी चिकन, मटण, चिकन ड्राय फ्राय, मलाई घी रोस्ट चिकन, घरगुती मटण, चिकन सुख्खा, तवा/रवा/कोळीवाडा मध्ये पापलेट, सुरमई, बेबी सुरमई, बोंबील, क्रॅब असे विविध ऑप्शन उपलब्ध आहेत. त्याशिवाय मटण कांजी रस्सा, व-हाडी, सावजी आळणी उकड, कंदुरी, निहारी, मटण करी, कोल्हापुरी मटण खीमा, आखाडी मटका मटण हंडी, व-हाडी, सावजी, दम मटका, आखाडी चिकन हंडी या डिशपण ट्राय करुन पहायलाच हव्यात.

मटण किंवा चिकनबरोबरच फिशच्या देखील विविध डिशचा समावेश या महोत्सवात स्पेशली करण्यात आला आहे. ज्यांना भाताचे विविध प्रकार आवडतात त्यांच्यासाठी देखील येथे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. इंद्रायणी मटण खुष्का, आखाड स्पेशल मटण आणि चिकन बिर्याणी आणि खीमा फ्राय राइस नक्कीच ट्राय करण्याजोगा.

मात्र सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच पार्सल नेणा-यांची संख्या थोडी वाढली आहे. त्यामुळे ख-या खवय्यांना मनसोक्त नॉनव्हेज खाता यावे म्हणून किलोच्या पद्धतीने पार्सलची सुविधादेखील उपलब्ध आहे. यात सुख्खा चिकन, मटन, तसेच चिकन, मटण बिर्याणीचा ऑप्शनदेखील आहे. तसेच फॅमिलीसाठी एक किलो व अर्धा किलोच्या ऑप्शनसह मिळेल. यात सुख्खा, रस्सा आणि इंद्रायणी मटण, चिकन भात अशी सुविधा आहे.

मग अजिबात वाट न बघता संपूर्ण घरासाठी चमचमीत जेवणाचा आजच बेत बनवा आणि प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये आपली ऑर्डर नोंदवा.

 

हॉटेल रागा,

स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी,

फोन – ८८८८०७७७९९, ०२०२७६५७७९९

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.