Spartan Monsoon League : इलेव्हन स्टॅलियन क्लब, एकदंत क्रिकेट क्लब, स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब संघांचा पहिला विजय

एमपीसी न्यूज : स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत इलेव्हन स्टॅलियन क्लब, एकदंत क्रिकेट क्लब आणि स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आनंद रामपुरीया याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इलेव्हन स्टॅलियन क्लबने टायटन बुल्स् संघाचा 5 गडी राखून सहज पराभव केला.आनंद याने 22 धावात 4 गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला.

शुवरा भादुरी याच्या 80 धावांच्या खेळीच्या जोरावर स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब संघाने टायटन बुल्स् 9 गडी राखून सहज पराभव केला. टायटन बुल्स्ने संदीप मौर्या याच्या 92 धावांच्या जोरावर 182 धावांचे आव्हान उभे केले होते.स्टॅलियन्स् क्रिकेट क्लबने शुवरा भादुरी (नाबाद 80 धावा), नितीश सप्रे (49 धावा) आणि सुरज दुबळ (नाबाद 44 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर हे आव्हान सहज पार केले आणि गुणांचे खाते उघडले.

कुंज दिक्षीत याच्या अष्टपैलू खेळीमुळे एकदंत क्रिकेट क्लबने स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लबचा 9 गडी राखून सहज पराभव केला.कुंज याने 36 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 80 धावांची खेळी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

टायटन बुल्स् : 20 षटकात 10 गडी बाद 145 धावा (अरविंद सिंग 65 (38, 4 चौकार, 5 षटकार), अभिषेक झा 21, आनंद रामपुरीया 4 – 22, मोहीत कुमार 2 – 25) पराभूत वि. इलेव्हन स्टॅलियन क्लब : 19 षटकात 5 गडी बाद 146 धावा (आनंद रामपुरीया नाबाद 39, प्रीतम गुजारे नाबाद 32, श्रेयस राजेंद्र 30, विक्रम राव 2 – 22); सामनावीरः आनंद रामपुरीया;

टायटन बुल्स् : 19 षटकात 4 गडी बाद 182 धावा (संदीप मौर्या 92 (52, 7 चौकार,7 षटकार), संतोष सागळे 50 (29, 8 चौकार), निखील भुजबळ 2 – 28) पराभूत वि. स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब : 16.2 षटकात 1 गडी बाद 185 धावा (शुवरा भादुरी नाबाद 80 (54, 11 चौकार, 2 षटकार), नितीश सप्रे 49 (30, 5 चौकार, 2 षटकार), सुरज दुबळ नाबाद 44 (14, 1 चौकार, 6 षटकार); (भागिदारी : पहिल्या गड्यासाठी शुवरा भादुरी आणि नितीश 112 (68); दुसर्‍या गड्यासाठी शुवरा भादुरी आणि सुरज 73 (30); सामनावीरः शुवरा भादुरी;

स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लब : 20 षटकात 7 गडी बाद 151 धावा (तुशार श्रीवास्तव नाबाद 44 (27, 4 चौकार, 2 षटकार), असीम ज्ञानेश्‍वर 28, विश्‍वेश उटांगळे 27, सुदर्शन गुणे 4 – 18, कुंज दिक्षीत 2 – 19) पराभूत वि. एकदंत क्रिकेट क्लबः 11.1 षटकात 1 गडी बाद 153 धावा (कुंज दिक्षीत नाबाद 80 (36, 8 चौकार, 6 षटकार), अमोल नाजन 31, गणेश आंम्रे नाबाद 28); सामनावीरः कुंज दिक्षीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.