Spartan Monsoon League : स्पार्टन्स् क्रिकेट क्लबचा सलग दुसरा तर, रायझिंग स्टार्स संघाची विजयाची हॅट्रीक

एमपीसी न्यूज – स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ (Spartan Monsoon League) अजिंक्यपद टी – 20 क्रिकेट स्पर्धेत स्पार्टन्स् क्रिकेट क्लब संघाने सलग दुसरा तर, रायझिंग स्टार्स संघाने विजयाची हॅट्रीक नोंदवली.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रतिक जावकर याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने एकदंत क्रिकेट क्लबचा 71 धावांनी पराभव केला. स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 177 धावांचे आव्हान उभे केले. अमित देशपांडे याने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. याशिवाय किरण देशमुख (28 धावा) आणि परीचय वझे (26 धावा) यांनी धावांचे योगदान दिले. याला उत्तर देताना एकदंत क्रिकेट क्लबचा डाव 106 धावांमध्ये आटोपला. स्पार्टन्स्च्या प्रतिक जावकर याने 23 धावात 4 गडी टिपले आणि संघाचा विजय सोपा केला.
गौरव बाबर याच्या अचूक गोलंदाजीमुळे रायझिंग स्टार्स संघाने इलेव्हन स्टॅलियन क्लबचा 69 धावांनी पराभव केला.रायझिंग स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना 152 धावा फलकावर लावल्या. अभिषेक कौशिक (43 धावा), हेमंत पाटील (28 धावा) आणि साजन मोदी (31 धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला.याचा पाठलाग करताना इलेव्हन स्टॅलियन क्लबचा डाव 83 धावांवर गुंडाळला गेला. गौरव बाबर याने 11 धावात 4 गडी बाद केले. अभिषेक कौशिक (2-18) आणि कौस्तुभ बाकरे (2-3) यांनीही अचूक गोलंदाजी करून संघाला झटपट विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पार्टन्स् क्रिकेट क्लब : 20 षटकात 6 गडी बाद 177 धावा (अमित देशपांडे 69 (42, 9 चौकार, 4 षटकार), किरण देशमुख 28, परीचय वझे 26, आनंद राजन 2- 20) वि.वि. एकदंत क्रिकेट क्लब : 17.1 षटकात 10 गडी बाद 106 (गणेश साळुंके 20, ऋषीकेश दळवी 29, प्रतिक जवकर 4 – 23, निखील भोगले 2-15); सामनावीर : प्रतिक जावकर;
रायझिंग स्टार्स : 20 षटकात 8 गडी बाद 152 धावा (अभिषेक कौशिक 43, हेमंत पाटील 28, साजन मोदी 31, सैफ अलि 3 – 39, हितेश चंदामनी 2 – 33) वि.वि. इलेव्हन स्टॅलियन क्लब : 13.5 षटकात 10 गडी बाद 83 धावा (आदित्य चौहान 35, गौरव बाबर 4 – 11, अभिषेक कौशिक 2 – 18, कौस्तुभ बाकरे 2 – 3); सामनावीरः गौरव बाबर.