_MPC_DIR_MPU_III

Talegaon : सोमाटणे येथे गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता; पिठापूरहून आणल्या श्रींच्या पादुका

एमपीसी न्यूज – दरवर्षी प्रमाणे यावर्षी दत्तमंदिर ट्रस्ट सोमाटणे यांच्या वतीने सात दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष मु-हे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

सातही दिवस सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत पारायण व नंतर मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या भजनी मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव येथील पोटोबा भजनी मंडळ, शिरगाव येथील रोकडोबा भजनी मंडळ, थुगाव येथील शिवशंकर एकतारी भजनी मंडळ, चांदखेड येथील समर्थ रघुनाथ बाबा भजनी मंडळ, सोमाटणे येथील महिला भजनी मंडळ, सोमाटणे पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळ यांनी सहभाग घेतला. यावर्षी या पारायण सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आंध्रप्रदेश राज्यातील पिठापूर येथील आणलेल्या श्रींच्या पादुका.

या परिक्रमा करताना हभप आंधळे महाराज हभप दत्ता महाराज डिंगरे,संतोष मु-हे, संजीवकुमार बोडके, महेश बोडके, चिंतामण सावंत, सत्यवान बोडके, संदीप कुंभार यांनी पीठापूर येथून कर्नाटक येथील श्री क्षेत्र कूरवपूर नंतर श्री क्षेत्र गाणगापूर व अक्कलकोट या पादुकांचे दि 10 रोजी टोलनाका सोमाटणे येथे आगमन झाले आणि नंतर या पादुकांची टोलनाका ते दत्तमंदिर मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत सोमाटणे आणि परिसरातील दत्त भक्तांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर नोंदवला. या पालखीत सुवासिनी डोक्यावर तुळस, कलश घेऊन मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी बँड, ढोल ताशांच्या मंगलमय सुरात ही मिरवणूक असल्याने व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या दत्त महाराजांच्या जयघोषात सोमाटणेचे वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. दि 11 रोजी सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी 11 वाजता वडगाव येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12 वाजता आरती, सायंकाळी 6 वाजता दत्त जन्म सोहळा यात गावातील भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पाळणे गायले व आरती करण्यात आली. रात्री भजनाचा कार्यक्रम करण्यात आला व दिवसभर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. असेही मु-हे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धीरज मु-हे, ट्रस्टचे कार्याध्यक्ष रुपेश मु-हे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मु-हे, सचिन मु-हे, उपसरपंच सुप्रांची मु-हे, उद्योजक विशाल मु-हे, माजी उपसरपंच राकेश मु-हे, आशा मु-हे, नितीन मु-हे, अक्षय मु-हे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.