Chicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू – कू चिकन फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज – ख-याखु-या नॉनव्हेज खाणा-या खवय्याला कोणत्याही कारणाची, निमित्ताची गरज नसते. एखाद्या ठिकाणी मस्त, चमचमीत नॉनव्हेज मिळतं म्हटल्यावर त्यांची पावले आपसूक त्या हॉटेलकडे वळतात आणि तिथल्या खास मेहनत घेऊन बनवलेल्या डिश खाऊन तो खवय्या तृप्त होतो. अशीच जर तुमची वेगळ्या चवीच्या पण टेस्टी अशा चिकनच्या डिश खायची इच्छा झाली असेल तर तुम्हाला प्राधिकरण येथील हॉटेल रागाला भेट द्यायलाच हवी. कारण हॉटेल रागामध्ये सध्या खास चिकनप्रेमींसाठी कुक – डू – कू चिकन फेस्टिव्हल सुरु झाला आहे. पुढील महिनाभर हा फेस्टिव्हल सुरु राहणार असून चिकनच्या एकापेक्षा एक सरस, टेस्टी डिश येथे चाखायला मिळणार आहेत.

या कुक – डू – कू फेस्टिवलनिमित्त वेगवेगळ्या प्रांतामधील खास डिश हॉटेल रागामध्ये उपलब्ध आहेत. जेवणाची सुरुवात आपण साधारणपणे सूपने करतो. त्यासाठी येथे खाउत्से चिकन सूप हे खास बर्मीज सूप उपलब्ध आहे. वेगवेगळ्या भाज्या, चिकनचे तुकडे आणि नूडल्स यापासून बनलेली ही डिश ‘मस्ट ट्राय’ या प्रकारातली आहे. त्याशिवाय क्रीम ऑफ चिकन, चिकन तंगडी सूप, थाई चिकन सूपदेखील उपलब्ध आहे. त्यानंतर येणा-या स्टार्टर्समध्ये मुर्ग पारचे कबाब, चिकन चंगेझी कबाब, रान – ए – मुर्ग, चटपटा टिक्का, कुर्ग तंगडी फ्राय, ड्रॅगन चिकन स्प्रिंग रोल आणि लेमन पेपर चिकन अशा एकसे बढकर एक टेस्टी स्टार्टर्सवर येथे ताव मारता येईल.

त्यानंतर येणा-या मेन कोर्समध्ये तर अनेक ऑप्शनस् आहेत. रोस्ट चिकन करी, आपल्या इंडियन्सचं अत्यंत आवडतं ढाबा बटर चिकन, गावाकडच्या स्वादाची आठवण करुन देणारी देहाती चिकन करी, कंदुरी चिकन करी, गुंटुर चिकन करी, कोझी करी, रेंडॉंग चिकन करी अशा वेगवेगळ्या प्रांतांची ओळख करुन देणा-या डिश येथे आहेत. या करीज् बरोबर खाण्यासाठी स्पेशल चिकन कुलचा आणि मसाला अप्पम आहेत. मात्र हे सगळं खाताना थोडीशी भूक शिल्लक ठेवायला हवी. कारण नंतर येणा-या राइसमध्ये देखील काही प्रकार मस्ट ट्राय या प्रकारातील आहेत. चिकन कारपोव्ह राइस आणि मुर्ग खिमा राइस खाऊन पाहायलाच हवा तसेच चिकन तवा पुलाव, नेल्लोर चिकन बिर्याणी आणि नेहमीची आवडती तंदुरी चिकन बिर्याणीची टेस्ट घ्यायलाच हवी.

सध्या वातावरणात हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. संध्याकाळी अजूनही मस्त थंड वातावरण असते. या गुलाबी थंडीत मित्रमंडळींसोबत किंवा फॅमिलीसोबत चिकनच्या वेगवेगळ्या डिश ट्राय करायच्या असतील तर हॉटेल रागामधील ‘कुक – डू – कू चिकन फेस्टिव्हल’ला आवर्जून भेट द्यायलाच हवी.

पत्ता – 

हॉटेल रागा,
स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी,
फोन –  8888077799, 02027657799

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.