World First Aid Day : रुग्णांचे आपत्कालीन स्थितीत प्राण वाचवण्यासाठी तृतीयपंथीयांना प्रथमोपचाराचे खास धडे

पुण्यातील लोकमान्य रूग्णालयाचा विशेष उपक्रम

एमपीसी न्यूज – ईमर्जन्सीमधील  रूग्णांना वेळीच उपचार मिळावेत, या अनुषंगाने ‘जागतिक प्रथमोपचार दिना’निमित्त येत्या 14 सप्टेंबर रोजी पुण्यातील लोकमान्य रूग्णालयात खास तृतीयपंथीयांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले आहे. साधारणतः 20 तृतीयपंथी या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित होते. अपघातग्रस्तांना त्वरीत प्रथमोपचार मिळणे, हा यामागील मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाला तृतीयपंथींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसरा आठवडा ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ म्हणून साजरा केला जातो. सध्या रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच कमी वयात ह्दयाघातामुळेमृत्यु होताना आपण पाहतो आहेत अशावेळी वेळीच वैद्यकीय उपचार न मिळणं हे यामागील मुख्य कारणं आहे.

जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त वैद्यकीय ईमर्जन्सीमध्ये  प्राथमिक उपचार देऊन त्यांचा जीव कसा वाचवावा, यासंदर्भात तृतीयपंथींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशा लोकांकडे समाजाचा पाहण्याचा उद्देश वेगळा आहे. त्यांच्यामधील कोणाला मदत लागली तर त्यांना ज्ञान असावे,तृतीयपंथी बऱ्याचदा रस्ते, महामार्ग आणि टोलनाके यांसारख्या अपघातग्रस्त ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे ही मंडळी अपघातात जखमी झालेल्यांना पटकन मदत करू शकतात, या विचारातून तृतीयपंथींना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 20 जणांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या या लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून समाजपयोगी कामात मदत व्हावी, या यामागील मुख्य उद्देश आहे.

पुण्यातील लोकमान्य रूग्णालयातील रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सर्जन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैदय म्हणाले की, ‘‘दररोज अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अफाट आहे. आम्ही दरवर्षी 15,000 पेक्षा जास्त अपघात प्रकरणे गंभीर स्थितीत पाहतो. अशा प्रकरणात त्वरीत शस्त्रक्रियेची गरज असते. अपघात झाल्यानंतर जखमीसाठी पहिला एक तास खूप महत्त्वाचा असतो. या तासभरात प्राथमिक उपचार मिळाल्यास रूग्णालयात नेईपर्यंत रूग्णाचे जीव वाचवता येऊ शकतो.

असा अंदाज आहे की, साधारणतछ रस्ते अपघातात मरणाऱ्या 10 पैकी 8 जण वाचू शकतात. परंतु, बऱ्याचदा अपघाताच्या ठिकाणी वैद्यकीय मदत लवकर मिळत नाही. यासाठी सर्वसामान्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले आहे. या उपक्रमातंर्गत आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे.यावर्षी 10 हजार लोकांना प्रशिक्षण दिले आहे. ईमर्जन्सीमधील पिडीत व अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणं हे आमचे ध्येय आहे’’, असेही डॉ. वैदय म्हणाले.

लोकमान्य रूग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले की, ‘‘ईमर्जन्सी  कशी व कुठे होईल हे सांगता येत नाही. तसेच ती जात,धर्म,पंथ, भेद, लिंग पाहुन पण येत नाही.त्यामुळे त्यावेळी लगेच मिळालेला प्रथमोपचार अगदी लाखमोलाचा ठरू शकतो. यामुळे प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकांचे कर्तव्यच आहे. म्हणूनच अपघातग्रस्तांना प्रथमोपचाराची नितांत गरज लक्षात घेऊन सर्वसामान्य लोकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यासाठी ,सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी,खासगी कंपन्यांमधील कर्मचारी, महामार्गावरील ढाब्यावरील कर्मचारी, रिक्षाचालक आणि बस चालक यांना सीपीआर, प्रथमोपचार कार्यशाळा सुरू केली आहे.’’

सोनाली दळवी तृतीयपंथी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, ‘‘आजकालच्या करोनाच्या काळात जीव वाचविण्यापेक्षा जीव घेणारेच जास्त आहेत असा अनुभव येतो.जीवरक्षणासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रमात या रूग्णालयाने खास आमची निवड केल्याने आम्ही आभारी आहोत. इमर्जन्सीमध्ये गंभीर झालेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही नक्कीच मदत करू. एखाद्याचे आमच्यामुळे प्राण वाचल्यास आम्हाला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून नेहमीच वेगळं ठेवण्यात आले आहे. लोक आमचा स्विकार करत नाहीत. परंतु, रूग्णालयाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, हा विश्वास आम्ही नक्कीच पूर्ण करू.’’

लोकमान्य हाॅस्पिटलचे उपाध्यक्ष श्री.हेमंत कुलकर्णी यांनी प्रक्षिणार्थीना प्रमाणपत्रे देवुन सन्मान केला व आभार व्यक्त केले.

लोकमान्य हॉस्पिटलने अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मोबाइल ट्रॉमा क्रिटिकल केअर युनिट (MTCCU) करता 9822242100 संपर्क क्रमांक सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.