Srilankan Airlines :भारतीयांसाठी श्रीलंकन ​​एअरलाइन्स ची खास ऑफर, आता मिळणार विमानाच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

एमपीसी न्यूज : भारता शेजारील देश श्रीलंकेने आता ज्या भारतीयांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी प्रवेश सुरू केला आहे. आणि त्याचबरोबर श्रीलंकन ​​एअरलाइन्स भारतीय प्रवाशांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे. श्रीलंकन ​​एअरलाइन्स ने भारतीय पर्यटकांसाठी ‘एक खरेदी करा आणि एक विनामूल्य मिळवा’ अशी ऑफर ठेवली आहे, ज्या अंतर्गत कोलंबोहून भारतात परत जाण्यासाठी एका तिकिटासह एक तिकिट मोफत असणार आहे.

श्रीलंका एअरलाइन्स 1 सप्टेंबरपासून भारतादरम्यान आपली सेवा पुन्हा सुरू करत आहे. कोलंबो ते मदुराई, तिरुचिरापल्ली, त्रिवेंद्रम आणि कोची पर्यंत साप्ताहिक उड्डाणे असतील. कोलंबो ते दिल्ली आणि हैदराबादसाठी आठवड्यातून दोनदा उड्डाणे चालतील. चेन्नई आणि मुंबई दरम्यानच्या सेवा आठवड्यातून 5 दिवस आणि बेंगळुरू दरम्यानच्या सेवा आठवड्यातून तीन दिवस वाढवल्या जातील.

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांना यापुढे श्रीलंकेत क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. परंतु यासाठीही काही अटी घालण्यात आल्या आहेत. एअरलाइन्सने म्हटले आहे की, भारतातून श्रीलंकेत येणाऱ्या पर्यटकांनी लसीचा दुसरा डोस किमान 14 दिवसांपूर्वी घेतला पाहिजे. यानंतर, श्रीलंकेला जाताना, त्याला अनिवार्यपणे आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल, जी निगेटिव्ह आली पाहिजे. जर एखाद्या पर्यटकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याला रुग्णालयात नेले जाईल. तसेच निगेटिव्ह आढळलेली व्यक्ती आपल्या इच्छेनुसार देशात कुठेही फिरू शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.