Pune News : नियमावलीचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके : रुबल अग्रवाल

अतिक्रमण आणि घनकचरा निमर्लून विभागाचे कर्मचारी व्यावसायिकांवर कारवाई करणार आहेत.

एमपीसी न्यूज – सरकारने अनलॉकचा निर्णय घेताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीही जाहीर केली आहे. त्याचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून त्यांच्याकडून बुधवारपासून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे, असा इशारा पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.

 दुकानांमध्ये तसेच मॉलमध्ये सोशल डिस्टिसिंगचे पालन न होणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, यासारख्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण आणि घनकचरा निमर्लून विभागाचे कर्मचारी व्यावसायिकांवर कारवाई करणार आहेत. पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

पुण्यात कोरोनाचे 1 लाख 22 हजार 448 रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये 1 लाख 2 हजार 95 रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आतापर्यंत या आजारामुळे 2 हजार 875 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 478 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनावर सध्या औषध नसल्याने मास्क लावणे, फिजिकल डिस्टनसिंग पाळणे, सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.