Pune : शहरांतर्गत वाहतुकीला येणार गती; महापौर आणि पोलीस आयुक्तांची सर्वंकष चर्चा

उपाययोजना संयुक्तपणे करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत होऊन गती मिळावी, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सर्वंकष चर्चा झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्तांसह वाहतूक आणि परिवहन विभागाचे अधिकारी, महापालिका आयुक्त आणि खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे आणि पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन यासारख्या प्रश्नांबाबत संयुक्त समितीमार्फत निर्णय घेतले जाणार आहेत.

पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन मनपा स्थायी समिती सभागृहात महापौर मोहोळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक दीपक पोटे, उमेश गायकवाड, गायत्री खडके, अजय खेडेकर यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल, शांन्तानु गोयल, अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा )संजय शिंदे, प्रादेशिक परिवहन विभागाचे उपायुक्त संजीव भोर, पुणे मनपातील पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, उपायुक्त माधव जगताप, श्रीनिवास बोनाला, विजय दहिभाते, राजेंद्र राऊत, माधव देशपांडे, जयंत भोसेकर, नितीन उदास, सुरेश जगताप, अॅड. निशा चव्हाण, विलास कानडे, प्रवीण गेडाम उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘नागरिकांचा प्रवास सुसह्य, सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या बैठकीच्या माध्यमातून एकत्रितपणे मते जाणून घेत त्यावरील उपाययोजननांची प्रभावीपणे अंमलबजावणी तातडीने करणार आहोत. पथारी व्यावसायिकांचे प्रश्न, त्यांचे पात्र-अपात्रता, पुनर्वसनाचे विविध पर्यायांचा अवलंब करणे आणि त्याचबरोबर शहरात येणारी जड वाहने, प्रवासी बसेस यांच्या वाहतूक नियोजनाचे प्रश्न, वाहतुकीवरील ताण कमी करणे, शहराच्या ७६ विविध भागातील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत सार्वजनिक रस्ते, जागा, अशा ठिकाणी अडथळा ठरणारी वाहने उचलणे, प्रवासी थांबे शहराचे बाहेर अथवा गर्दीपासून दूर योग्य ठिकाणी प्रवासी थांब्याचे नियोजन करणे, ज्या परिसरात मेट्रोचे काम चालू आहे अशा ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी संख्या वाढवून वाहतूक सुरळीत होण्याकरता नियोजन करणार आहोत’.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘नो हॉकर्स झोन, मान्यताप्राप्त ४५ रस्ते, महत्त्वाचे रस्ते, गर्दीचे चौक, रस्ते व त्या परिसरातील वाहतूक नियमन, पथारी व्यावसायिक व अतिक्रमणे याबाबत बैठकीतील चर्चा व समितीमधील निर्णय यानुसार प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, निर्णयापूर्वी संबंधितांशी चर्चा, जागा पाहणी आणि परिसरानुसार करावयाचे नियोजन तसेच शहरातील रस्त्यालगत असलेली अडथळा ठरणारी परिस्थिती, त्यावर कोणते निर्णय घ्यायचे याबाबत पुस्तिका तयार करून अंमलबजावणी करणे आवश्यक राहील, तसेच समाविष्ट अकरा गावांबाबतही नियोजन करणे आवश्यक आहे’.
पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम म्हणाले, ‘शहरातील वाहतूक समस्या त्याचप्रमाणे शहरातील अपघाताची संख्या कमी करण्यास आणि वाहतुकीच्या सुरळीत, संरक्षितपणामुळे नागरिकांना शहर सुसह्य वाहतुकीस योग्य वाटेल याकरता दोन्ही विभागांकडून यशस्वी कामकाज नियोजन होऊन वाहतूक समस्या निराकरणाकरिता मदतच होईल’.

‘ती’ वाहने नष्ट होणार

जुनी बेवारस जप्त, पडीक वाहने यांना नष्ट करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभाग, न्यायालय आदेश, पोलीस व मनपा यांच्या संयुक्त निर्णयाने अशा प्रकारची वाहने नष्ट करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.