Akurdi : आकुर्डीतील झीअल कंपनीच्यावतीने सौंदर्यवती स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज  – झीअल  कंपनीवतीने सौदर्यवती स्पर्धेचे आयोजन आकुर्डी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सौंदर्यवती स्पर्धेत 50 स्पर्धकांनी भाग घेतला.

आकुर्डी येथे झालेल्या या सौंदर्यवती स्पर्धेचे उदघाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, बशीर सुतार ,  चित्रा जोरी, सरीता साने, कसमा धुमाळ,   जितेंद्र जोशी, राजश्री  घागरे, दिपाली खैरनार, अमोल भोंगाळे,  हेमा गुमाटी, सागर चाकवणे  आदी उपस्थित. होते. झीलतर्फे झील फॅशन शो ही स्पर्धा घेण्यात आली. या सौंदर्यवतीमध्ये 50च्यावर स्पर्धकांनी भाग घेतला. ओळख परेड, रॅंम्प वॉक, प्रश्नोत्तरे आदी निकषांवर निवड करण्यात आली.

या स्पर्धेत सिध्दी हंबीर, संजम कौर, अनुष्का हरके, मयुरेश माटे, हर्षवर्धन शिंदे, निसर्ग बाबर,  चिन्मय पाचपांडे, सुरेश भराडे यांनी तर वृंदा भंडारी, कल्पना घारे, जयश्री मोजे, पायल बाविस्कर, गुनीत रामगिरिआ, इशान गोडसे आदींनी किताब पटकाविला.

या स्पर्धेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सहभाग दर्शविला. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राची प्राथमिक फेरी असल्याने या स्पर्धेच्या हे स्पर्धक पुढच्या लेवलसाठी गेले आहे. सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपुर अशा विविध ठिकांणाहून ही स्पर्धा आयोजित करुन त्यातून पहिले तीन विजेते महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत पोहोचले. या स्पर्धेची तयारी झीअल कंपनीच्या डायरेक्टर स्विटी गोसावी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.