Bhosari : संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अध्यात्मिक कार्यक्रम

आमदार महेश लांडगे यांची माहिती

एमपीसी न्यूज -श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदीर जिर्णोध्दार समितीच्या वतीने पुणे, आळंदी रस्त्यावरील च-होली, वडमुखवाडी येथील मंदीरात गुरुवारी (दि. 7 फेब्रुवारी) ‘श्री मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा’ हभप शांतीब्रम्ह मारुती महाराज कु-हेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे निमंत्रक आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड आणि जिर्णोध्दार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे-आळंदी पालखी महामार्गावर वडमुखवाडी येथे असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, गणेश, दत्त आणि हनुमंत आदी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मंदिरात 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या सोहळ्यानिमित्त मंदीरात मंगळवारी (दि. 5) सकाळी 8 वाजल्यापासून होम हवन, 9 वाजता श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी पूजा व ज्ञानज्योत प्रज्वलन, सकाळी साडेनऊ वाजता हभप शांतीब्रम्ह मारुती महाराज कु-हेकर यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीची आळंदीमध्ये नगर प्रदक्षिणा व मुर्तीचे थोरल्या पादूका मंदीरात आगमन ओनर आहे. यामध्ये पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळे, दिंड्या, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यी सहभागी होणार आहेत.

  • अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा :
    बुधवारी (दि. 6) मंदीरात होम हवन, अग्नी उध्दरण, आवाहीत देवता पुजन, प्रधान देवता पर्याय होम, क्षेत्रपाल भैरव होम करण्यात येईल. गुरुवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता ब्रम्हादी देवता होम, प्रसाद उत्सर्ग होम, बलीदान पुर्णाहुती, श्रींच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापणा व महाआरती असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मंदीरात गुरुवार (दि. 31 जानेवारी) पासून शुक्रवार (दि. 8 फेब्रुवारी) पर्यंत रोज रात्री 7 ते 9 यावेळेत किर्तन आणि शनिवारी (दि. 9) सकाळी 10 ते 12 यावेळेत काल्याचे किर्तन होणार आहे.

यामध्ये गुरुवारी (दि. 31) हभप बंडा महाराज कराडकर, शुक्रवारी (दि. 1) हभप प्रमोद महाराज जगताप, शनिवारी (दि. 2) हभप पुरुषोत्म महाराज पाटील, रविवारी (दि. 3) हभप शंकर महाराज शेवाळे, सोमवारी (दि. 4) हभप चंद्रकांत महाराज वांजळे, मंगळवारी (दि. 5) हभप मारुती महाराज थोरात, बुधवारी (दि. 6) हभप नामदेव महाराज चव्हाण, गुरुवारी (दि. 7) हभप पांडुरंग महाराज गिरी, शुक्रवारी (दि. 8) प्रवीण महाराज लोळे यांचे किर्तन तसेच शनिवारी (दि. 9) गुरुवर्य हभप पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.