Pune : ‘त्यांनी’ लुटला बालदिनाचा  आनंद ! 

एमपीसी न्यूज – ज्यांना जग काय आहे हे माहित नाही, ज्यांचे आयुष्य केवळ स्वतःपुरते सीमित आहे अशा विशेष मुलांनी स्वतःच्या हातावर टॅटू काढण्याचा आनंद घेत, पिझ्झा , बर्गर ,केकचा आस्वाद घेत बालदिनाचा आनंद लुटला. 
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही जंगली महाराज रस्त्यावरील मॅक्डोनाल्डस येथे विशेष मुलांसाठी बालदिनानिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते.

माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष मुलांनी केक कापून पंडित नेहरू यांचा जन्मदिन साजरा केला. यावेळी बालचमूंसाठी  टॅटू पेंटिंग, पेन्सिल स्केचची व्यवस्था करण्यात आली होती, टॅटू आणि स्केच काढून घेण्यात आणि ते पाहण्यात ही मुले हरखून गेली होती. यावेळी यलो चित्रपटात अभिनय करणारी व   राष्ट्रपती पुरस्कार विजेती गौरी गाडगीळ कथ्थक नृत्यात निपुण ठरलेली सायली आगवणे या विशेष मुलींची उपस्थिती होती.
याप्रसंगी संयोजक अमित बागुल , पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे तसेच  अभिषेक बागुल, महेश ढवळे, सागर आरोळे,धनंजय कांबळे,  सतीश कांबळे , सुरेश कांबळे , सन्मित चौधरी , बाबालाल पोळके, इम्तियाज तांबोळी, सुनिल लोखंडे  आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.