Pune : एसपीएमची दुहेरी आगेकूच

सृजन कप 2019 आंतरशालेय बास्केट बॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – सृजन कप 2019 अंतर्गत सुरू झालेल्या आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत पहिल्या दिवशी एसपीएम प्रशाला संघांनी मुले आणि मुलींच्या गटातून विजय मिळवून झकास सुरुवात केली. या लढती डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरू आहेत. मुलांच्या गटात एसपीएम संघाने मध्यंतराच्या 10-5 अशा आघाडीनंतर सरदार दस्तूर होसांग बॉईज प्रशाला संघाचा 19-14 असा पराभव केला.

एसपीएमकडून अजिंक्य पुंडलिक याने 13 गुणांची नोंद केली. त्याला आराह दिनकर याने सहा गुण मिळवून सुरेख साथ केली. पराभूत संघाच्या सिद्धार्थ मोहिते आणि साहिल जाधव यांनी अनुक्रमे 5 आणि 6 गुण नोंदविले. मुलींच्या गटात त्यांनी गुरुनानक पब्लिक स्कूलचा 20-11 असा नऊ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला त्यांच्याकडे 14-2 अशी मोठी आघाडी होती. विजयी संघाकडून आर्या भाटे हिने 8, तरआर्या थिटे हिने 4 गुण नोंदविले. गुरुनानक प्रशाला संघाच्या श्रुती सुर्वेने 8 गुण नोंदविले.

दिवसातील सर्वात चुरशीच्या सामन्यात मुलांच्या गटात विद्याभवन प्रशाला संघाने मध्यंतराची 17-19 अशी पिछाडी भरुन काढत विद्यांचल स्कूलचा 28-26 असा दोन गुणांनी पराभव केला. विद्या भवनच्या शिवराज पटेल याने सर्वाधिक 14 गुण मिळविले. त्याला श्रेयन गोसवी याने 7 गुण मिळवून साथ केली. विद्यांचलकडून कमल सरणने, तर अनिष काळभोर यांनी प्रत्येकी 9 गुण मिळविले.

निकाल –
मुले – एसपीएम 19 (अजिंक्य पुंडलिक 13, आराह दिनकर 6) वि.वि. सरदार दस्तूर होशांग बॉईज स्कूल 14 (सिद्धार्थ मोहिते 5, साहिल जाधव 6) मध्यंतर 10-5

विद्या भवन 28 (शिवराज पटेल 14, श्रेयन गोसावी 7) वि. वि. विद्यांचल स्कूल 26 (कमल सरण 9 अनिष काळभोर 9) मध्यंतर 17-19
कमल नयन बजाज 43 (सुयश पाटिल 8, जोशू डीक्रूझ 8) वि.वि. गुरुनानक पब्लिक स्कूल 11 (बचातर सिंग 9) मध्यंतर 33-5
मुली – इन्फंट जीझस 31 (पूर्वा भिरुड 10, कशिष बाफना 7) वि.वि. विद्या भवन 8 (ऋुतुजा पाटिल 4, रिया देसाई 4) मध्यंतर 18-4
एसपीएम 20 (आर्या भाटे 8, आर्या थिटे 4) वि.वि. गुरुनानक पब्लिक स्कूल 11 (श्रुती सुर्वे 8) मध्यंतर 14-2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.