Pune : विविध सामाजिक संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ,धर्मप्रेमी यांचा हिंदू एकता दिंडीत उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज- सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. या अभियानानंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी हनुमान जयंती पासून हे अभियान राबवण्यात आले.

Alandi : आळंदी रोड परिसरातून पिस्टल, गावठी कट्टा जप्त; तिघांना अटक

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि हिंदु राष्ट्रविषयी जागृती करण्यासाठी हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत रविवार, दि. 28 मे 2023 या दिवशी पुण्यात (Pune) ‘भव्य हिंदू एकता दिंडीची’ सांगता झाली.

 भिकारदास मारुति मंदिराच्या इथे धर्मध्वज पूजन आणि शंखनादात दिंडीचा प्रारंभ झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा, महाराष्ट्राची कुलदैवत श्री भवानीमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेल्या, फुलांनी सुशोभित केलेल्या पालख्यांसहित दिंडी मार्गस्थ झाली, पुढे शनिपार चौक – लक्ष्मी रस्ता – अलका टॉकीज चौक मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरील विमला गरवारे शाळेच्या मैदानात दिंडीची सांगता झाली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते, भोर मधील फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, गायत्री परिवार, वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्त तसेच भोर, शिरवळ, जुन्नर, तळेगाव, लोणावळा येथील अनेक संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ असे एकूण 12000 जण यावेळी सहभागी झाले होते.

नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी, रणरागिणी, हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक वेशातील साधक, कार्यकर्ते, तुळशी घेतलेल्या महिला अशी विविध प्रकारची पथके, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील बालवीर, मावळे, बाजी प्रभू देशपांडे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या वेशातील रणरागिणी तसेच स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके हे दिंडीचे मुख्य आकर्षण होते.
 हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या जयघोषात, रामनाम संकीर्तनात तसेच भक्तीमय वातावरणात दिंडी विमला गरवारे शाळेच्या मैदानात पोहचल्या या वेळी ह.भ.प.दत्तात्रय चोरघे महाराज, पनुन काश्मीर संघटनेचे रोहित भट, तसेच सनातन संस्थेचे चैतन्य तागडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर यांनी सहभागी झालेल्या धर्मवीरांचे आभार मानून हिंदू एकता दिंडीची सांगता झाली.
https://youtu.be/f1DHtMeyvQ4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.