Talegaon Dabhade News : महाराष्ट्र बंदला तळेगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतक-यांच्या झालेल्या हिंसा प्रकरणाबाबत महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला तळेगाव दाभाडेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशनच्या मराठा क्रांती चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन तळेगाव स्टेशन परिसर व गाव भागातून पदयात्रा काढून, घोषणा देत व्यापाऱ्यांना, व्यवसायिकांना व्यवहार बंद करण्याबाबत आवाहन केले. व्यापाऱ्यांनी व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला व्यवहार बंद ठेवत पाठिंबा दिला.

यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक गणेश खांडगे, किशोर भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे,संगीता शेळके, ज्योती शिंदे, निशा पवार,रूपाली दाभाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, कृष्णा कारके, माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ गवारे, सुदर्शन खांडगे, नंदकुमार कोतूळकर तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आशिष खांडगे, तुषार काळोखे, शिवसेनेचे दत्तात्रय भेगडे, देव खटरमल, सिद्धनाथ नलावडे, मुन्ना मोरे, अमर खळदे, संकेत खळदे, आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीतर्फे सोमवारी पुकारलेल्या बंदच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा, बँका, शासकीय कार्यालय, वाहतूक व्यवस्था प्रामुख्याने चालू होती. तर इतर ठिकाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.