Pune News : ‘म्हाडा’च्या घरांच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या(म्हाडा) सदनिकांसाठी गुरुवारपासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणी सुरु झाल्यानंतर एकाच दिवसात तब्बल 81 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. इच्छुकांना येत्या 11 जानेवारीपर्यंत ही नोंदणी करता येणार असल्याचे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने सांगितले. 

पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार 647 सदनिकांसाठी 22 जानेवारीला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत सहभाग घेण्यासाठी गुरुवार पासून ऑनलाइन नोंदणी सुरु करण्यात आली. या ऑनलाइन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले होते.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सांगितले की, पुणे म्हाडाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी सोडत आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने सदनिकांची सोडत कधीच झाली नाही. या सोडतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवार सायंकाळपर्यंत तब्बल 1 लाख 34 हजार युजर्स झाले आहेत. त्यापैकी 81 हजार 4 जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यापैंकी 72 हजार 907 जणांची नोंदणी मंजूर झाली आहे. 1 हजार 968 जणांची नोंदणी त्रुटींमुळे नाकारली गेली आहे. आणखी 6 हजार 98 जणांच्या नोंदणीची मंजूरी प्रलंबित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.