Tathawde : डॉ.डी.वाय पाटील कॉलेज येथील ‘पंजाब दि महक’ खाद्यमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेकनॉलॉजीच्या विद्यार्थांनी आयोजित केलेला ‘पंजाब दि महक’ खाद्यमहोत्सव मंगळवार (दि १८)  उत्साहात साजरा झाला. पारंपरिक पंजाबी खाद्यमहोत्सवाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  पंजाबी संगीत, पारंपरिक वेशभूषा व नृत्य सादरीकणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

डॉ.डी.वाय पाटील कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेकनॉलॉजी अभ्यासक्रमाचे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केलेल्या पंजाब दि महक खाद्यमहोत्सवाला खवय्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या मोहत्सवाचे उद्घाटन  मंगळवार (दि १८)  डॉ.डी.वाय पाटील कॉलेजचे कुलपती पी. डी. पाटील यांच्या हस्ते पार पडले. पारंपारिक पंजाबी वेशभूषा परिधान करत विद्यार्थांनी पंजाबी संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना घडवले. बहारदार पंजाबी संगीत व  नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. शेकडो पंजाबी खाद्य पदार्थ आणि विद्यार्थ्यांची उत्तम सादरीकरणाची कला या निम्मिताने उपस्थितांना अनुभवायला मिळाली.

या प्रसंगी सावित्रिबाई फुले विद्यापीठ पुणेचे रजिस्ट्रार डॉ प्रफुल पटेल, प्राईड ग्रुप ऑफ हॉटेलचे डायरेक्टर अरुण नय्यर, डबल ट्री हॉटेल चे जनरल मॅनेजर आदित्य मल्ला व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थांना मार्गदर्शन करताना आदित्य मल्ला म्हणाले “हॉटेल व्यवसायाला  खूप चांगले दिवस असून ते योग्य क्षेत्रात असल्याचे त्यांनी सांगितले”.

विद्यार्थांना व्यवसायिक ज्ञान मिळावे तसेच सादरीकरण आणि सेवा या विषयाची प्रत्यक्ष ओळख व्हावी हा या खाद्य मोहत्सवाचा मुख्य उद्देदेश होता. या मोहत्सवातील सर्व खाद्य पदार्थ आणि कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थांनी स्वतः केले होते. या वेळी विद्यार्थांनी बनवलेल्या पंजाबी टोमॅटो धनिया शोरबा, अमृतसरी मच्छी, पनीर लबाबदार, गुलाबजाम, जलेबी, फिरणी,पंजाबी कढी, सरसो का साग पंजाब दि बिर्याणी, गाजर का हलवा, मुर्ग माखनी जलेबी या सारख्या पदार्थांचा आस्वाद जवळपास ८०० खवय्यांनी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.