Bhosari News : संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 466 अनुयायांनी रक्तदान केले. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन,भोसरी ब्रांच च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे रविवारी सकाळी 8 ते 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.

संत निरंकारी रक्तपेढीचे डॉ. मारुती कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली 200 युनिट, तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. शंकर मोसलगी यांनी 266  युनिट रक्त संकलन केले. शिबिराचे उद्घाटन पुणे झोन प्रभारी आणि माजी नगरसेवक पंडित  गवळी  यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या शिबिरादरम्यान भोसरी-दिघी परिसरातील स्थानिक नगरसेवक, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपमहापौर हिरानानी घुले यांनी सदिच्छा भेट दिली.

एप्रिल 2021 पासून पुणे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत संत निरंकारी मिशन तर्फे 20 रक्तदान शिबिर संपन्न झाले असून 2372 युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले.

भोसरी सेक्टरचे प्रमुख अंगद जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  मिशनच्या भोसरी सेक्टरच्या सर्व अनुयायांचे योगदान लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.