PimpleSaudagar : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील रोझलॅण्ड सोसायटीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना स्वनिर्मितीचा आनंद घ्यावा. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पुण्यातील इकोएक्झिट आणि पिंपळे सौदागर येथील रोझलॅण्ड सोसायटी यांच्यावतीने या पर्यावरणपूरक गणेशोत्सव कार्यशाळेचे आयोजन केले होते.

याबाबत माहिती देताना इकोएक्झिस्टच्या लोलिता गुप्ता म्हणाल्या, गणेशोत्सवासाठी काही महिने शिल्लक आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी अनेक संस्था व नागरिक पुढाकार घेतात. या संस्थेच्या वतीने गणेश मूर्ती, वापरण्यात येणारे रंग आणि सजावट या सर्व बाबी पर्यावरणपूरक पद्धतीने कशा करता येतील याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी  काही दिवस अगोदर तयारी सुरु होते. ते नियोजन सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी ही आजची कार्यशाळा घेण्यात आली.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) एवजी शाडू माती, पेपरपासून मूर्ती कशा बनवायच्या याचे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच नैसर्गिक रंग आणि सजावट देखील नैसर्गिक पद्धतीने सजावट कशी करावी याचे ही मार्गदर्शन त्यांनी केले. या कार्यशाळेत लोलिता गुप्ता यांच्याबरोबर निकिता पटेल यांचा सहभाग होता. या कार्यशाळेचे नियोजन रोझलॅण्ड सोसायटीच्या सभासदांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.