Shivtejnagar News : राष्ट्रवादीतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

122 नागरिकांची तपासणी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 15 आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 122 नागरिकांनी नावनोंदणी करुन आरोग्य तपासणी केली.

शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज (गुरुवारी) झालेल्या आरोग्य शिबिराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, ओबीसी महिला विभागाच्या सारिका पवार, कविता खराडे आदी उपस्थित होते.

या शिबिरात कान, नाक, घसा, डोळ्यांची तपासणी करण्यात आली. 122 नागरिकांनी नावनोंदणी करुन आरोग्य तपासणी केली. डॉ. योगेश पाटील, डॉ. पुष्पा घाटे-साळवी, डॉ. चिन्मय खराडे यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरात आजाराचे निदान झालेल्या रुग्णावरील पुढील उपचार अल्प दरात केले जाणार आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढील उपचार केले जाणार असल्याचे आयोजक नारायण बहिरवाडे यांनी सांगितले.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान हे शिवतेजनगर भागात गेली दोन वर्षांपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यातील एक उपक्रमाचा भाग म्हणून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी तसेच सर्व स्वामी भक्तांनी या आजच्या शिबिराला भरघोस प्रतिसाद दिला. 122 नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला, असे आयोजक बहिरवाडे यांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सेवा प्रतिष्ठानच्या जेष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, युवा मंच, सेवेकरी सर्वांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.