Pimpri : मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि श्री सत्यसाई सेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल रावेत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 198 विद्यार्थ्यांची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, स्वाती प्रदीप वाल्हेकर, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. निरंजन पाटील, डॉ. शिल्पा नारायणन, श्री सत्यसाई सेवा संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, शुभांगी वाल्हेकर, सदस्या प्रणाली हारपुडे पाटील, स्वाती सुनिल वाल्हेकर, गणेश बोरा, रोहन वाल्हेकर आदी उपस्थित होते.

सध्या शहरात थंडी, ताप, सर्दी, खोकला, स्वाईन फ्ल्यू, डेंगु, मलेरीया यांसारख्या साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. साथीच्या आजारामुळे मुलांचे शाळेतील हजेरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरामध्ये दोन डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये मुलांमध्ये पोटाचे आजार व डोळयांचे आजार यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. तसेच मुले स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे गरजेचे असल्याचे प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे आय टी डायरेक्टर गणेश बोरा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निरंजन पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.