Pimpri : मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि श्री सत्यसाई सेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी प्राथमिक शाळा वाल्हेकरवाडी मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 169 विद्यार्थ्यांची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कल्याणराव खामकर, डॉक्टर निरंजन पाटील, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, स्वाती प्रदीप वाल्हेकर, श्री सत्यसाई सेवा संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, सदस्या प्रणाली हारपुडे पाटील, स्वाती सुनिल वाल्हेकर, माया सुभाष वाल्हेकर, अभिषेक सुभाष वाल्हेकर, बजरंग दल वाल्हेकरवाडी शाखा अध्यक्ष सोमनाथ दत्तात्रय वाल्हेकर, शुभांगी वाल्हेकर, सुभाष कळमकर, राम चव्हाण, सतिश कोटा, डॉ. शिल्पा नारायणन, डॉ. निकम, डॉ. सुषमा तेलंग, ब्रम्हानंद गाजंगी, बी के वासु, शाळेचे शिक्षक सुर्यभान तिकोणे, सुनंदा कोंडे आदी उपस्थित होते.

सध्या शहरात थंडी, ताप, सर्दी, खोकला, स्वाईन फ्ल्यू, डेंगु, मलेरीया यांसारख्या साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. साथीच्या आजारामुळे मुलांचे शाळेतील हजेरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरामध्ये चार डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये मुलांमध्ये पोटाचे आजार व डोळयांचे आजार यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. तसेच मुले स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे गरजेचे असल्याचे युवराज वाल्हेकर यांनी सांगितले.

श्री सत्यसाई सेवा संघटना ही ‍शहरातील वंचित घटक वीटभटटी मजूर, मजुर अडडयावरील कामगार, शेतातील उसतोड कामगार तसेच आदिवासी भाग, कुपोषणग्रस्त भागात आरोग्यसेवा देतात. संघटनेच्या वतीने डॉक्टर व औषधांसहित उपलब्ध असलेल्या मोबाईल वाहनासह जागेवर जाऊन तपासणी केली जाते. अशा प्रकारे गरजू लोकांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती बाळासाहेब वाल्हेकर यांनी दिली.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे युथ डायरेक्टर रो.निलेश मरळ यांनी सूत्रसंचालन केले. श्री सत्यसाई सेवा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.