_MPC_DIR_MPU_III

Pimpri : स्केटींग स्पर्धेत स्पोर्टस् एलयूपी इंडियाच्या टीमने इंडोनेशियात पटकावले ५ सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – इंडोनेशिया सरकार पुरस्कृत जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या v3 ओपन रोलर स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये स्पोर्ट्स एलयुपी इंडिया टीमने ५ सुवर्णपदकाची कमाई करीत यश संपादन केले. या स्पर्धेसाठी भारतातून पाच स्केटरची निवड झाली होती या स्पर्धेत व्ही 3 ओपन या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पोर्ट्स एलयुपी ने प्रत्येक विजयी स्केटरना इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप मिळाली होती.

_MPC_DIR_MPU_IV

भारतातून या स्पर्धेत सहभागी झालेले  विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे-

1)  ओवी प्रफुल पवार हिने सहा वर्षांखालील वयोगटात स्पीड कॅटेगरीत सुवर्णपदक मिळवले. तिला गोवा स्केटिंग फेस्टिवल 2019 मध्ये एक लाखाची स्पॉन्सरशिप मिळाली.

2) अथर्व पियुष भांड ने दहा वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक मिळवले. अथर्वला गोवा स्केटिंग फेस्टिवल 2019 मध्ये ५० हजाराची स्पॉन्सरशिप मिळाली होती.

_MPC_DIR_MPU_II

3) रीतम  होत्तीगीमाथ याने 14 वर्षाखालील वयोगटात स्पीड कॅटेगरीत सुवर्णपदक मिळवले. रीतम याने गोवा स्केटिंग फेस्टिवल मध्ये ७० हजाराची इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप मिळवली होती.

4)  अर्णव प्रशांत वामनाचार्य याने 14 वर्षाखालील वयोगटात quad कॅटेगिरीत गोल्ड मेडल मिळवले  या स्पर्धेसाठी अर्णव  गोवा स्केटिंग फेस्टिवल येथे 50 हजारची इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप मिळवली होती.

5)  निहाल धनलाल पाटले  याने सोळा वर्षाच्या वरील कोड कॅटेगरीमध्ये एक गोल्ड  व 1 रजत पदक पटकावले.  नीहालला गोवा स्केटींग
फेस्टीवलमध्ये 50 हजाराची इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप मिळाली होती.

गोवा स्केटिंग फेस्टिवल 2019 या स्पर्धेतून जिंकलेल्या स्केटरना इंडोनेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रत्येक सुवर्णपदक विजेत्यांना 1 लाख, रजतपदक विजेत्यांना 70 हजार,  ब्राँझ मेडल 50 हजार 4, 5  रॅंकच्या विजेत्यांना प्रत्येकी 30 हजारची आंतरराष्ट्रीय स्पॉन्सरशिप देण्यात आली होती. तसेच 2018 गोवा स्केटिंग फेस्टिव्हलमध्ये जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 10 हजार 5 हजार व 3 हजार अशी रोख बक्षीस देण्यात आले होते.  आंतरराष्ट्रीय खुल्या स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आले.

या सर्व खेळाडूंचे भारतात परतल्यावर एअरपोर्टवर जंगी स्वागत केले. व्ही 3 या स्पर्धेत हाँगकाँग, न्युझीलँड, इंडोनेशिया, मलेशिया व इंडिया या देशातून सुमारे साडेचारशे स्केटर्स सहभागी झाले होते. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन ॲंडी आजमीन (Andy Azmin) यांनी केले. स्पोर्ट्स एलयूपी इंडिया टिमचे प्रमुख म्हणून वैभव बेळगी व समन्वयक म्हणून राहुल बेळगी, रिषभ कावेडिया यांनी काम पाहिले. v3 ओपन चॅम्पियन्सशिपच्या सर्व विजेत्या खेळाडूंची बॅंकॉक, थायलंड येथे २४- २६ सप्टेंबर १९ या दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.