Sports News : जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालय आणि सिटी इंटरनॅशनल स्कूलची बाजी

एमपीसी न्यूज : जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन (Sports News) स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले गटात निगडी येथील अमृता विद्यालय तर 17 वर्षाखालील मुले गटात पिंपरी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल विजयी ठरले. जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये 14 व 17 वर्षाखालील मुली गटात अमृता विद्यालय विजयी ठरले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि अमृता विद्यालय निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाट्न अमृता महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका ब्रह्मचरणी पवना अमृता चैतन्य प्राणा यांच्या हस्ते निगडी येथील अमृता विद्यालयात झाले. या प्रसंगी विद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक शेखर कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख रंगराव कारंडे उपस्थित होते.

प्रसाद हरपाळे, प्रीतम परदेशी यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन अमृता विद्यालयाने केले. सुभाष जावीर, युवराज गवारी बाळू काळभोर यांनी नियोजनासाठी पुढाकार घेतला. 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर अखेर 14, 17 व 19 वयोगटातील मुले व मुलींच्या स्पर्धा होणार आहेत.

14 वर्षाखालील मुले अंतिम निकाल पुढील प्रमाणे – Sports News 

1) अमृता विद्यालय, निगडी विजयी विरुद्ध सेंट उर्सुला हायस्कूल, आकुर्डी (2-0) 35-22 ,35-17
2) द्वितीय क्रमांक – सेंट उर्सला हायस्कूल,आकुर्डी
3) तृतीय क्रमांक – न्यू पूणे पब्लिक स्कूल, निगडी

14 वर्षाखालील मुली अंतिम निकाल –

1) प्रथम क्रमांक अमृता विद्यालय, निगडी विजयी विरुद्ध न्यू पूणें पब्लिक स्कूल, निगडी
(2-1) 35-22, 32-35, 35-21

2) द्वितीय क्रमांक – न्यू पुणे पब्लिक स्कूल निगडी
3) तृतीय क्रमांक – कै. वसंत दादा पाटील विद्या मंदिर आकुर्डी

17 वर्षाखालील मुले अंतिम निकाल –

1) प्रथम क्रमांक- सिटी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी विजयी विरुद्ध अमृता विद्यालय निगडी
(2-1) 26-35, 35-30, 35-16
2) द्वितीय क्रमांक- अमृता विद्यालय निगडी
3) तृतीय क्रमांक – न्यू पुणे पब्लिक स्कूल निगडी

17 वर्षाखालील मुली अंतिम निकाल –

1) प्रथम क्रमांक- अमृता विद्यालय निगडी विजयी विरुद्ध सेंट उर्सुला हायस्कूल,आकुर्डी
(2-0) 35-11, 35-20
2) द्वितीय क्रमांक- सेंट उर्सुला हायस्कूल व जुनिअर कॉलेज आकुर्डी
3) तृतीय क्रमांक – सिटी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी.

Warje News : प्लंबिंगचे काम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.