Sports News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज : क्रीडा विभागामार्फत प्रतिष्ठेचा (Sports News) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

संचालनालयाने अर्ज करण्यासाठी पूर्वी 30 जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. तथापि, विविध क्रीडा संघटना खेळांडूंच्या विनंतीनुसार आता 20 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 20 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत पुरस्कारासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.

Bye-Election : चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे

साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारांसाठी कामगिरीचा (Sports News) कालावधी त्या पुरस्कार वर्षातील 30 जून रोजी संपण्याऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल. पुरस्कार अर्जाचे नमुने क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.