Pune News : क्रीडा अधिकारी मंजुरीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे क्रीडा अधिकाऱ्यांच्या (शारीरिक संघटक) आकृतीबंधाच्या मान्यतेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, यापूर्वी शिक्षण मंडळामार्फत क्रीडा अधिकाऱ्यांच्या 18 पदांचा आकृतीबंध राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. परंतु सरकारने सात पदांना अनुमती दिली.

महापालिकेची 15 क्षेत्रिय कार्यालय आहेत. प्रत्येक कार्यालयासाठी किमान एक क्रीडा अधिकारी असणे आवश्यक आहे. त्यासाठी आणखी आठ पदांना मान्यता द्यावी यासाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या निर्णयाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.