Sputnik V : भारतात रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापराला परवानगी

एमपीसी न्यूज – भारतात रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली असून, लसीच्या मर्यादित वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

स्पुटनिक लसीच्या प्रतिबंधित वापरासाठी परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे. कोविड-19 ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक लस 92 टक्के परिणामकारक ठरली असल्याचा तेथील आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक व्ही सोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध होणार आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.