Sputnik-V vaccine News : सिरम इन्स्टिट्युटमध्ये सप्टेंबरपासून स्पुटनिक- V लसीचे उत्पादन

एमपीसी न्यूज – भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. 

भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे सीईओ कायरिल दिमित्रिएव्ह यानी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली.

‘सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. काही इतर भारतीय उत्पादक देखील या लसीच्या उत्पादनासाठी तयार आहेत, असं ते म्हणाले.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि सिरम इन्स्टिट्युट यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार भारतात वर्षाला तीस कोटी स्पुटनिक व्ही लसीचे डोस उत्पादित करण्याचा मानस आहे. यापैकी लसीच्या डोसचा पहिली हफ्ता येत्या सप्टेंबर महिन्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.