Pune News : पुण्यातील या हॉस्पिटल मध्ये रशियन स्पुटनिक लस झाली उपलब्ध

एमपीसी न्यूज :  कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन बरोबरच आता रशियन बनावटीची स्पुटनिक ही कोरोना प्रतिबंधक लस पुण्यात उपलब्ध झाली आहे.

या लशीचा राज्यातील पहिला डोस पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये देण्यात आला. येत्या सोमवारपासून (ता. २८) ही लस पुणेकरांसाठी उपलब्ध आहे. अर्थात, त्यासाठी कोविन या ॲपवरून किंवा पोर्टलवरून नावनोंदणी आवश्यक आहे. गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ”पुण्यातील ३६ वर्षांच्या नागरिकाने राज्यातील पहिली स्पुटनिकची लस घेतली.

पुण्यात या लशीचे सहाशे डोस आले आहेत. त्याचे लसीकरण बुधवारपासून सुरू झाले. त्याच्या पहिल्या टप्प्यात डॉ. रेड्डी लॅबच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारपासून ती पुणेकरांसाठी खुली होणार आहे. या लशीचेही दोन डोस आहेत. त्याचा दुसरा डोस २१ दिवसांनंतर मिळणार आहे.”

एक हजार १४५ रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही डॉ. पुणतांबेकर यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.