Maval : वराळे गावात घरातील स्वयंपाकघरात आढळली घोरपड

एमपीसी न्यूज – वराळे गाव येथे घरातील स्वयंपाक घरात घोरपड आढळली. मावळच्या वन्यजीव रक्षक संस्थेने या घोरपडीला पकडून तिला वनविभागात निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.  वराळे गावातील रहिवासी चाफेकर यांच्या घरात ही घोरपड आढळली होती. 

चाफेकर यांना घोरपडीची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी वन्यजीव रक्षक संस्था मावळ या संस्थेच्या सदस्यांना घरातील स्वयंपाक घरात पालीसारखा मोठा प्राणी आला आहे, अशी माहिती दिली. ही माहिती मिळताच संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना तिथे सुमारे 3 फूट लांब व 2 किलो वजनाची घोरपड असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी या घोरपडीला पकडून तिची नोंद वनविभागात करून तिला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. या बचाव कार्यामध्ये संस्थेचे सूरज शिंदे, नयन कदम, निनाद काकडे, अनिकेत भालेराव यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारचे अनेक प्राणी बचावकार्य या आधी संस्थेने केले आहेत, असे सांगण्यात आले.

यावेळी त्यांनी घोरपडी विषयी माहिती दिली. हा प्राणी आता अत्यंत दुर्मिळ होत चालला असून सहसा तो परिसरात आढळत नाही. या प्राण्याचे प्रमुख
अन्न झाडावरील पक्षी किटक आणि पक्ष्यांची अंडी हे असते हा प्राणी पूर्णपणे मांसाहारी आहे, अशी माहिती प्राणीमित्रांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.