Pimpri-Chinchwad Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतले तणावमुक्तीचे धडे
एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दैनंदिन जिवनात तसेच कर्तव्यावर असताना तणावमुक्त कसे रहावे याचे धडे कार्यशाळेत गिरवले.(Pimpri-Chinchwad Police) या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय किर्तीचे व्याख्याते सुनिल पारेख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक शास्त्रीय उपाय समजावून सांगितले.
ही कार्यशाळा रविवारी (दि.2) सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत निगडी मुख्यालय येथे आयोजित कऱण्यात आली होती. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंद, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परि-1मंचक इप्पर, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय काकासाहेब डोके,सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, पोलीस आयुक्त गुन्हे सागर कवड़े सहायक, पिंपरी सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा को, सहायक पोलीस आयुक्त प्रशासन सतीश माने,आयुक्तालयातील सर्व पोलीस प्रभारी अधिकारी आदी उपस्थित होते.
MPC News Podcast 4 October 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट
“Mind Power Unlimited या विषयावर सुनिल पारेख यांनी व्याख्यान दिले.यामध्ये सबकॉन्सीअस माईड आणि कॉन्सीअस माईंड: (Pimpri-Chinchwad Police) या बद्दल सखोल मार्गदर्शन करून मनाची ताकद वाढविणे करीता शास्त्रीय उपाय समजावून सांगितले तसेच जीवनामध्ये यशस्वी होणेकरीता शास्त्रीय सात मार्गदर्शक तत्व समजावून सांगितले. त्याप्रमाणे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सोप्या टिप्स समजावून सांगितल्या.
यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सुनिल पारेख यांचे आभार व्यक्त करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तणावमुक्त राहून तसेच मनाची ताकत वाढवुन महाराष्ट्र पोलीस दलाची शौर्याची (Pimpri-Chinchwad Police) व त्यागाची परंपरा जोपासून पोलीस दलाचे नाव अधिकाधिक उंचवावे या करीता मार्दगर्शन केले.