Sri Lanka out of Petrol – चक्क श्रीलंकामध्ये पेट्रोल संपले???

एमपीसी न्यूज : श्रीलंकाचे नवनिर्वाचित पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घोषित केले, कि “आमच्याकडे पेट्रोल (Sri Lanka out of Petrol) संपले आहे… याक्षणी, आमच्याकडे फक्त एका दिवसासाठी पेट्रोलचा साठा आहे. ” येत्या काही महिन्यांत त्यांच्या दिवाळखोर देशाला आणखी अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

गेल्या आठवड्यात महिंदा राजपक्षे यांनी आर्थिक परिस्थितीवर सतत विरोध दर्शविल्यानंतर विक्रमसिंघे यांना पंतप्रधान बनवले गेले.  त्यांनी चालू संकटावर उपाय शोधण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रीय परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. श्रीलंका एअरलाईन्सचे खाजगीकरण करण्याचाही त्यांनी प्रस्ताव मांडला.

पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी कोलंबोमध्ये प्रतिपादन केले, कि “सध्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था अत्यंत अनिश्चित आहे. माजी सरकारच्या अर्थसंकल्पात SLR 2.3 ट्रिलियन कमाईचा अंदाज असला तरी, SLR 1.6 ट्रिलियन हा या वर्षाच्या महसुलाचा वास्तववादी अंदाज आहे,”

Rajbhavan : राजभवनाला राज्य शासनाकडून मागच्या 2 वर्षात 60 कोटींहून अधिक रक्कम

14 अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होता आणि अल्पावधीत महागाई वाढण्याची शक्यता असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, “पगार आणि अत्यावश्यक गोष्टींसाठी आम्हाला पैसे छापणे सुरू ठेवावे लागेल. ते पुढे म्हणाले, की भारतीय क्रेडिट लाइन वापरून आणखी दोन पेट्रोल आणि डिझेल शिपमेंट करायचे आहेत. “नोव्हेंबर 2019 मध्ये, आमचा परकीय चलनसाठा $7.5 अब्ज होता. तथापि, आज, तिजोरीसाठी $1 दशलक्ष शोधणे एक आव्हान आहे. अर्थ मंत्रालयाला गॅस आयात (Sri Lanka out of Petrol) करण्यासाठी आवश्यक $5 दशलक्ष उभे करणे कठीण जात आहे,” असे विक्रमसिंघे यांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.