SSC, HSC Result : दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा उद्या निकाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचा उद्या (बुधवारी) निकाल जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर उद्या दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 आणि बारावीची पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर उद्या दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुस-या दिवसापासून पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावरुन दहावीसाठी (http.verification.mh-ssc.ac.in) आणि बारावीसाठी http.verification.mh-hsc.ac.in) , तसेच स्वत:, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यासाठी आवश्यक अटी-शर्ती संकेतस्थळावर दिल्या आहेत. गुणपडताळणीसाठी गुरुवार (दि.21) ते शुक्रवार (दि.30) पर्यंत तर छायाप्रतीसाठी गुरुवार (दि.21) ते मंगळवार 9 नोव्हेंबर पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.