SSC Exam : दहावीच्या परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) 2024 साठी बसणाऱ्या ( SSC Exam ) विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे (SSC form) सादर करण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील नियोजनाप्रमाणे नियमित शुल्कासह आवेदनपत्र सादर करण्याची मुदत 20 नोव्हेंबर रोजी संपणार होती. त्यात दहा दिवस मुदतवाढ देत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदनपत्र भरता येणार आहेत. शाळांनी सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने नियमित शुल्कासह आवेदनपत्रे सादर करण्याची मुदत 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येतील. शाळांना फी भरण्यासाठी 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत मुदत आहे.

Railway : मध्य रेल्वेला सात महिन्यात सापडले 27 लाख फुकटे प्रवासी

यापुढे आवेदनपत्रे नियमित व विलंब शुल्काने भरण्याच्या तारखांना कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच आवेदनपत्रे अतिविलंब शुल्काने सादर करण्याच्या तारखा यशावकाश कळवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले आहे.

चालू शैक्षणिक वर्षाची दहावीची परीक्षा मार्च 2024 मध्ये होणार आहे. त्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी केली आहे. अभ्यासाला वेळ मिळावा तसेच विद्यार्थ्यांची परीक्षेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी व्हावी यासाठी ठराविक वेळेत या तारखा जाहीर करण्यात आल्या ( SSC Exam ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.