SSC Exam Cancelled : दहावीच्या परीक्षा रद्द ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

एमपीसी न्यूज – राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक सुरु झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान , बारावीच्या परीक्षा होणार आहेत.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटवरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यी आणि शिक्षक यांची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

_MPC_DIR_MPU_II

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.