SSC-HSC 2023 : दहावी – बारावीच्या बोर्ड परिक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC-HSC 2023) शिक्षण मंडळाने दहावी –बारावीच्या बोर्ड परिक्षांच्या संभाव्य तारखा जाहिर केल्या आहेत. या परिक्षा साधारणपणे 21 फेब्रुवारी 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा म्हणजे दहावीच्या बोर्ड परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार आहेत. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय़ अभ्यासक्रम म्हणजे 12 वी बोर्ड परिक्षा या 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार आहेत. यासंबंधी दिनांक निहाय परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक हे आज सोमवार (दि.19) शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

Talwade Triveni Nagar : तळवडे त्रिवेणी नगर मार्गावरील उघडे चेंबर देत आहेत अपघाताला निमंत्रण

आभ्यासक्रम, विद्यार्थ्यावरील ताण याचा (SSC-HSC 2023) विचार करून हे संभाव्य वेळापत्रक मंडळाने जाहिर केले आहे. तरीही शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी तारखांची खात्री करून त्यांच्या काही हरकती असतील तर त्यांनी 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मंडळाकडे पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता त्याची मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाशी पडताळणी करून खातर जमा करावी, व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.