SSC HSC Board Exam : दहावी – बारावी बोर्डाची परिक्षा ऑफलाईनच – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज – दहावी आणि बारावी बोर्डाची परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत बोलताना दिली. सध्या काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे तर, काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सुरु आहे. पण, दहावी आणि बारावीची बोर्डाच्या परिक्षेचा विचार करता त्या ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या लागतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

विधानसभेत बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हाणाल्या दहावी आणि बारावीची बोर्डाची परिक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या लागतील. महाराष्ट्रातील दुर्गम भागाचा विचार करता त्या ऑनलाईन पद्धतीने घेणं शक्य होणार नाही. तसेच, या परिक्षा महाविद्यालय परिक्षांपेक्षा वेगळ्या असतात. या बोर्डाच्या परिक्षा असून त्यावर गुणवत्ता यादी देखील अवलंबून असते. त्यामुळे परिक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या लागतील.

या परिक्षेचे नियोजन कशा पद्धतीने करायचे याबाबत सध्या विचार सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकार म्हणून मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. त्यानुसार साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बोलत आहे. मुलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेऊन सुरक्षित परिक्षा पार पाडणे हाच आमचा सरकार म्हणून उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.