SSC-HSC Exam : हुर्रे….दहावी-बारावीच्या परिक्षेसाठी दहा मिनिटांचा वाढीव वेळ

एमपीसी न्यूज – होय, तुम्ही एकत आहात (SSC-HSC Exam) ते खर आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या सुरुवातील मिळणारी दहा मिनिटे आता पेपरच्या शेवटी मिळणार आहेत. त्यामुळे ही दहा मिनिटे विद्यार्थ्यांसाठी बोनस ठरणार आहेत.

यासंबंधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने आज (बुधवारी) एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दहावी-बारावीच्या परिक्षेत परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परिक्षा दालनात परीक्षेच्या वेळे आधी प्रश्नपत्रिका दिली जात होती. मात्र, हे पेपर मोबाईलवर तसेच अन्य समाजमाध्यमातून व्हायरल होत असल्याने या घटनांना आळा बसावा, सुरळीत परिक्षा पार पडाव्यात, यासाठी फेब्रुवारी-मार्च 2023 पासून सुरुवातीची मिळणारी दहा मिनिटे आता परीक्षेच्या निर्धारीत वेळेनंतर मिळणार आहेत.

PMC : चार वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक सुधारणेची कामे पुन्हा सुरू

उदाहरणार्थ, सकाळच्या सत्रात 11 वाजता दिलेला पेपर दुपारी 2 वाजून दहा मिनीटांनी (SSC-HSC Exam) घेतला जाईल, तर ज्या विषयांचे पेपर हे अडिच तासांचे असतात ते 11 वाजता दिले जातील ते 1 वाजून 30 मिनीटांनी नाही तर 1 वाजून 40 मिनीटांनी घेतले जातील. असेच दुपारच्या सत्रात ही परीक्षेच्या निर्धारीत वेळेनंतर दहा मिनीटांनी पेपर जमा केले जातील. मात्र, असे असले तरी विद्यार्थ्यांनी आधी ठरलेल्या निर्धारित वेळेत परिक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे.

त्यामुळे वेळ पुरला नाही ही सबब न देता विद्यार्थ्यांना वेळेत पेपर पूर्ण करत निकोप वातावरणात परिक्षा देता येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.