SSC-HSC Exam News : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

एमपीसी न्यूज – दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे अखेर होणार आहेत.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा संदर्भात संभ्रमाचे वातावरण होते. या परीक्षा होणार की नाही. तसेच जर होणार असतील तर त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात होते. याबाबत शालेय शिक्षण विभागाने विविध क्षेत्रातील नागरिक आणि अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या परीक्षा जून महिन्यात होणार असून बारावीच्या परीक्षा मेअखेर होणार आहेत. यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची देखील काळजी घेण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भात सर्वांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. या सूचना मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्या. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.