SSC & HSC Result : दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचा उद्या निकाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी / फेरपरीक्षेचा निकाल उद्या (बुधवारी, दि. 23) ऑनलाईन पद्धतीने जाहिर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागातील दहावी, बारावीच्या पुरवणी / फेर परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये घेण्यात आली होती.

या परीक्षेचा निकाल उद्या मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील तसेच, माहितीची प्रत (प्रिंट आऊट) देखील काढता येणार आहे.

निकालाच्या दुस-या दिवसांपासून म्हणजेच गुरूवार (दि.24) ते 2 जानेवारी 2021 पर्यंत गुण पडताळणीसाठी तर, 12 जानेवारी 2021 पर्यंत छायाप्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.