SSC Result: आज दहावीचा ऑनलाइन रिझल्ट; येथे पाहा आपला निकाल

एमपीसी न्यूज : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Result) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (दि. 27) जाहीर होणार आहे. सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन माध्यमातून जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
https://www.tv9marathi.com

वरील संकेतस्थळावर परीक्षा बैठक क्रमांक (SSC Result) आणि आईचे नाव प्रविष्ट करून निकाल प्राप्त करता येईल. निकाल लागल्यानंतर मंगळवार (दि. 28) पासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. ही मुदत मंगळवार (दि. 11 जून) पर्यंत असेल.

यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे.

IPL 2024 Final : कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला तिसऱ्यांदा IPL चषक

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share