SSC Result 2022: पिंपरी-चिंचवडचा दहावीचा निकाल 97.73 टक्के

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराचा दहावीचा निकाल 97.73  टक्के (SSC Result 2022)  लागला आहे. मुलींचा निकाल 98.39 टक्के तर मुलांचा निकाल 97.17 टक्के  लागला आहे. पुर्नपरीक्षार्थ्यांचा 49.52  टक्के निकाल लागला आहे. तब्बल 124 शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे. दरम्यान, मागीलवर्षी शहराचा निकाल 99.92  टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदा निकालात 2.19 टक्‍क्‍यांनी घट झाली.

Monsoon League T 20 Cricket : आयोध्या वॉरीयर्स, ट्रोजन्स् क्रिकेट क्लब संघाचा पहिला विजय; इलेव्हन स्टॅलियन संघाची विजयीची हॅट्रीक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्यावतीने मार्च 2022 मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result 2022) आज (शुक्रवारी) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. शहरात दहावीच्या परीक्षेला 188 शाळांमधून एकूण 19, 674  विद्यार्थी बसले होते. यामध्ये 10, 616 मुले व 8978 मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून 10, 316 मुले तर 8834 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण 19 हजार 150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

Vishrantwadi Murder Case : खाणीत सापडलेल्या दोन मृतदेहांचे गूढ उलगडले, बहिणीला त्रास दिल्याच्या कारणावरून खून

शहरातील 423 पुर्नपरीक्षार्थ्यांनी (SSC Result 2022) अर्ज केला होता. त्यापैकी 300 मुले तर 123 मुली होत्या. यातर 422 पुर्नपरीक्षार्थ्यांनी दिली. त्यापैकी 209 पुर्नपरीक्षार्थ्यांनी यश मिळविले आहे. यापैकी 152 मुले व 57 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची 50.83 टक्के तर 46.34 टक्‍के मुलींची टक्केवारी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 माध्यमिक शाळांचा 91.09 टक्के निकाल लागला आहे. पिंपरी आणि क्रीडाप्रबोधिनी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर, सर्वाधिक कमी रूपीनगर शाळेचा 71.30 टक्के निकाल लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.