SSC Result 2023 : दहावीच्या निकालानंतरही शिक्षण महामंडळाची समुपदेशन सेवा राहणार सुरु

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Result 2023) दहावीच्या मार्च 2023 या बोर्ड परिक्षेचा निकाल आज (शुक्रवारी) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने परिक्षा काळात सुरु असणारे विद्यार्थ्यांने समुपदेशन निकाला नंतरही सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दहावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. त्यानंतर पुढील सलग आठ दिवस ही समुदेशन सुविधा विद्यार्थी व पालकांसाठी सुरु राहणार आहे. ही सुविधा सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सुरु राहणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना 7387400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299,8999923229, 9321315928, 7387647902, 8767753069 या मोबाइल क्रमांकाद्वारे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत निःशुल्क समुपदेशन करण्यात येईल.

Maval : राष्ट्रवादी मावळ तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या अध्यक्षपदी नथुशेठ वाघमारे यांची नियुक्ती

विद्यार्थ्यांनी नैराश्यातून कोणते पाऊल उचलू नये यासाठी हे समुपदेशन परिक्षा (SSC Result 2023) काळास सुरु केले होते तेच पुढे आता निकाला नंतरही पुढे आट दिवस सुरु राहणार आहे. त्यामुळे नापास झालो किंवा कमी मार्क मिळाले म्हणून निराश न होता समुदेशकाकडे आपली मने मोकळी करा,असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.