SSC Result : मोठी बातमी! उद्या लागणार दहावीचा निकाल

एमपीसी न्यूज : – बारावी पाठोपाठ आता दहावीच्य़ा निकालाचीही (SSC Result) तारीख महाराष्ट्र राज्य माध्यमीक व उच्चमाध्यमीक शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च 2023 च्या दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल हा उद्या म्हणजे शुक्रवारी (दि.2 जून) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.

हा निकाल विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in  या संकेत स्थळावर निकालपाहता येणार आहे. याबरोबरच www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर शाळांना एकत्रीत निकाल पहाता येणार आहे.

निकालासाठी राज्य माध्यमीक व उच्चमाध्यमीक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळे पुढील प्रमाणे

1)     www.mahresult.nic.in

2)     http://sscresult.mkcl.org

3)     https://ssc.mahresults.org.in

4)     https://hindi.news18.com/news/career/board-result-maharashtra-board

5)     https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023

6)     http://mh10.abpmajja.com

या अधिकृत साईटवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 हजार 33 हजार 67 मुलींचा समावेश होता.राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. 2 जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share