SSC Result : जैन इंग्लिश स्कूलची 100 टक्के निकालाची परंपरा बाराव्या वर्षीही कायम

एमपीसी न्यूज – जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी याहीवर्षी इयत्ता दहावीच्या (SSC Result) परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा राखत घवघवीत यश संपादन केले. शाळेची विद्यार्थिनी जिया तुषार गदिया ही 96 टक्के मिळवून प्रथम, अपूर्व प्रवीण वाकचौरे याने 94.20 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.

 

Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

देव सोमनाथ शिंदे याने 93.7 टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला, तसेच कुमारी सिद्धि संतोष भोसले ही 92. 20 टक्के मिळवून चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली. कुमारी मनस्वी हनुमंत तावडे हिने 91.60% मिळवून पाचवा क्रमांक संपादन केला आणि सहावा क्रमांक मिळवणारा ओम संजय शिंदे याने 91 .20% मिळवून यश संपादित केले.

 

 

जैन इंग्लिश स्कूलच्या एकूण 76 विद्यार्थ्यांपैकी 91 टक्के पेक्षा अधिक गुण संपादन करून सहा विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले, तसेच एकूण 26 विद्यार्थी 80 ते 89 %या गटातील टक्केवारी मध्ये यशस्वी झाले 35 विद्यार्थ्यांनी 70 ते 79 %या गटामध्ये यशस्वी होण्याचा मान पटकावला तर 60 ते 69% या गटामध्ये टक्के मिळवणारे नऊ विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जैन इंग्लिश स्कूल आणि जैन जुनियर कॉलेज चे संचालक मंडळ  स्कूल च्या तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचे कौतुक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.