SSC : 43 वर्षीय वडील झाले दहावी पास, तर मुलगा झाला नापास

एमपीसी न्यूज : पुण्यातील 43 वर्षीय वडील आणि त्यांचा मुलगा यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या (SSC) दहावीच्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेत वडील 43 टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. पण, मुलगा यशस्वी होऊ शकला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.

भास्कर वाघमारे हे टेम्पोचालक आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने  कुटुंबाला हातभार लावण्यासाठी 1993 साली सातवीमध्ये शाळा सोडली. आणि त्यांना नोकरी करावी लागली. परंतु, पुढे त्यांच्या शिकण्याची इच्छा कायम राहिली. तब्बल 30 वर्षांनंतर या वर्षी त्यांनी मुलासोबत परिक्षा दिली.

पुणे शहरातील बाबासाहेब आंबेडकर परिसरात राहणारे वाघमारे हे खासगी क्षेत्रात काम करतात. त्यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला नेहमीच अधिक अभ्यास करायचा होता, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते करू शकलो नाही. वाघमारे म्हणाले की, ”काही काळापासून मी माझा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी आणि काही कोर्स करण्यासाठी उत्सुक होतो. ज्यामुळे माझ्या नोकरीत आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल. म्हणून मी दहावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. माझा मुलगाही या वर्षी परीक्षेला बसला होता आणि त्याचा मला फायदा झाला.

Athava Rang Premacha : संघर्षाची खरीखुरी कहाणी असणारा सामाजिक चित्रपट – कुंदाताई भिसे

ते म्हणाला, की ते रोज अभ्यास करायचे (SSC) आणि कामानंतर परीक्षेची तयारी करायचे. वाघमारे यांना आता परिक्षा  उत्तीर्ण झाल्याचा आनंद झाला असला तरी मुलगा दोन विषयात नापास झाल्याची खंत त्यांना आहे. वाघमारे म्हणाले की, मी माझ्या मुलाला पुरवणी परीक्षेत (विशिष्ट विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित) मदत करेन. मुलगा या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होईल, याची मला खात्री आहे असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.